April 1, 2023

शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’च्या सेटवर परतणार?

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुरूवातीला टीव्हीवरील लोकप्रिय डान्स शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परिक्षक म्हणून दिसली होती. आता ती काही काळ शोमधून गायब झाली आहे. पती राज कुंद्राच्या अश्‍लील प्रकरणातील अटकेमुळे तिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या वीकेंड एपिसोडमध्ये शिल्पाची जागा कोण भरून काढणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तसंच शिल्पा शेट्टी काही काळ ब्रेक घेऊन पुन्हा परतणार हा, अशी चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर या शोमधून एक नवी माहिती समोर येतेय. अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा या शोमध्ये परतणार नाही. या वीकेंड एपिसोडमध्ये मौसमी चॅटर्जी आणि सोनाली बेंद्रे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर पुढच्या वीकेंड एपिसोडमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री संगीता बिजलानी दिसतील. यासोबत गीता कपूर आणि अनुराग बासू देखील दिसणार आहेत.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुढील काही आठवडे शोमध्ये परतणार नाही. दर आठवड्याला या शोमध्ये सेलेब्स पाहूणे बनून येत आहेत. हे सेलिब्रीटी या शोमध्ये सहभाग घेताना दिसून येणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्हाला शिल्पाच्या जागी कायम परिक्षकांची गरज नाही. शिल्पा लवकरच परत येईल, अशी आशा आहे. जर शिल्पाने शो सोडण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला पुढे जाऊन दुसरा परिक्षक शोधावा लागेल. सध्यासाठी तरी अभिनेत्री शिल्पा शेट्टी या शोमध्ये परतणार नाही, अशी प्रतिक्रिया या शोच्या मेकर्सनी दिलीय.

अभिनेते जॅकी श्रॉफ आतापर्यंत वेगवेगळ्या रिअॅलिटी डान्स आणि म्युझिक शोचा एक भाग बनलेले आहेत. ते विशेष अतिथी म्हणून ‘इंडियन आयडॉल’ या शोमध्ये सुद्धा आले होते. पुढील आठवड्यात अभिनेत्री संगीता बिजलानी देखील या शोचा एक भाग असणार आहेत. अभिनेत्री संगीता बिजलानी ‘त्रिदेव’ आणि ‘जुर्म’ सारख्या चित्रपटात झळकल्या आहेत. जॅकी श्रॉफ यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

https://www.instagram.com/p/CRavHYNlUaW

‘सुपर डान्सर 4’ मध्ये अनेक टॅलेंटेड स्पर्धक आहेत जे आपल्या दमदार परफॉर्मन्सने परिक्षकांसह प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकत असतात. दर आठवड्याला या शोमधील स्पर्धक आपला जबरदस्त आणि हटके परफॉर्मन्स देऊन चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा सुद्धा गेल्या आठवड्यात या शोमध्ये दिसले होते. अभिनेत्री करिश्मा कपूर सुद्धा या शोमध्ये झळकली होती. स्पर्धक आणि नृत्यदिग्दर्शक दर आठवड्याला परिक्षकांसमोर एक अनोखी संकल्पना सादर करतात. त्यामुळे वीकेंड एपिसोड पाहणं प्रेक्षकांसाठी फारच मनोरंजक असतं. सर्व स्पर्धक बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पाहुण्यांसमोर दणदणीत परफॉर्मन्स देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *